पुणे - कोरोनामुळे पुणे पोलीस दलातील आणखी एका पोलिसाला जीव गमवावा लागला आहे. पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत पोलीस निरीक्षक पुणे वाहतूक विभागात कार्यरत होते.
मृत पोलिसाला अशक्तपणा जाणवू लागल्याने 14 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोना झाला होता. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले गेले आणि 14 दिवस ते घरीच क्वांरटाइन होते. मात्र अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात भर्ती करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत 4 पोलीस जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 700 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 75 टक्के पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.