पुणे : राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल लागणार आहे याबाबत सगळीकडे उत्सुकता लागली आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांना राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत विचारले असता ते म्हणाले की उद्या सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्या निकालाचा सन्मान जनता करेल. आपण संविधान मानणारे आहोत. माझी जबाबदारी ही केवळ या निमित्ताने महत्वाची ठरत नाही. तर मी अध्यक्षपद स्वीकारले तेव्हापासून जबाबदारीने काम करत आलो आहे असे यावेळी नार्वेकर म्हणाले. ते आज भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आले होते.
भारती विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन : भारती विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रम भारती विद्यापीठ संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आलं आहे.
जबाबदारी महत्त्वाची : यावेळी नार्वेकर यांना त्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची असणार आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ही उद्यापासून महत्त्वाची नाही. तर, ज्या दिवशी मी अध्यक्ष म्हणून विराजमान झालो आहे. तेव्हापासून मी जबाबदारीने काम करत आहे. तसेच मी कायमच विदेशात जात नाही, केवळ 3 दिवसांसाठी जात आहे. त्याचा इथे काही परिणाम होणार नाही. सर्व कामकाज व्यवस्थित सुरू राहील असे यावेळी नार्वेकर म्हणाले.
हेही वाचा -
- Nitish Kumar Mumbai Visit: नितीश कुमार उद्या मुंबईत घेणार उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळाचे वेधले लक्ष
- Neet Exam : धक्कादायक प्रकार; परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परिधान करायला लावले उलटे अंतर्वस्त्र
- Bus Accident In Gandhinagar : खासगी बसची एसटीला जोरदार धडक, बसची वाट पाहणाऱ्या 10 प्रवाशांवर काळाचा घाला.