पुणे : रतनबाई उद्धव सुरवसे या सोलापूर जिल्ह्यातील 80 वर्षीय आजी पायी वारीत सहभागी होऊन पंढरपूरपर्यंत चालत प्रवास करत आहेत. तरुण मुलगा मृत्यू पावला तरीही त्या वारीत सहभागी झालेल्या आहेत. त्यांना आजही स्पष्ट ऐकू येते, स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे त्यांना चालताना कुठलाही थकवा येत नाही. खरंतर ही पांडुरंगाचीच कृपा म्हणावी लागेल. त्यामुळेच कदाचित अशा वाऱ्यांमध्ये या सगळ्या वयोवृद्ध व्यक्ती आपल्याला दिसत आहेत.
सात वेळा केला रायगड सर : या आजीने सात वेळा रायगड सर केलेला आहे. आजींना खरे तर रायगड सर करताना थोडा अवघड वाटतो. परंतु पंढरपूरच्या पायी चालताना मात्र आनंद असतो. अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांना आज कुठलाही आजार नाही. कुठलीही गोळी नाही, कुठलाही व्यायाम नाही. नित्यनियमाने रोजचे काम करायचे, एवढेच त्यांच्यातल्या या कणखरपणाचे वैशिष्ट्य आहे. आजीला कुठलीही दिंडी, कुठलाही महाराज नाही, पांडुरंग हा एकच महाराज आणि त्यांचे पाच सहा लोक हीच त्याची दिंडी आहे. 35 वर्षापासूनही अखंड सेवा असल्याचे आजी सांगत आहेत.
सर्वांना आनंदित ठेवावे : आजीच्या एका मुलाचे नुकतेच निधन झाले आहे. तरीही आजी आज वारीमध्ये सहभागी झाल्या आहेत. विठ्ठलाची आवड हेच एवढ्या दुःखात सुद्धा सहभागी होण्याचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. आजी अभिमानाने सांगतात की पाऊस पडेल, देव आपल्याला उपाशी मारणार नाही. सर्वांना आनंदित ठेवावे, एवढीच भावना विठ्ठलाकडे मी मागते, असे आजी म्हणतात. आजही आजीची स्मरणशक्ती इतकी दांडगी आहे, की त्यांना प्रत्येक गोष्ट समजते, लक्षात राहते, आठवते. हीच सगळी प्रेरणा कदाचित ही वारी महाराष्ट्रातल्या सगळ्या सहभागी वारकऱ्यांना देत असेल, म्हणून या प्रत्येक वारीत असे हजारो वयोवृद्ध आपल्याला दिसत आहेत.
हेही वाचा :