ETV Bharat / state

पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक - पुणे कोविड १९ रुग्ण संख्या

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी हद्दीतील कोरोना तपासणी करणाऱ्या शासकीय तसेच खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाला व इतर बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

pune covid 19
पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक
author img

By

Published : Jul 7, 2020, 1:28 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाविरोधात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी हद्दीतील कोरोना तपासणी करणाऱ्या शासकीय तसेच खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाला व इतर बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळांमध्ये कोरोना (कोविड-19) चाचणी संख्या वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, तसेच या लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होतात किंवा नाही याची तपासणी करणे. कोरोना टेस्टचा निर्णय कळण्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी सुद्धा माने यांच्याकडे देण्यात आली आहे.

क्रिडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोन्मेंट) हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना शोधून काढणे व आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्याकडे कोविड-19 विषाणू कोरोनाबाधित सर्व रुग्णांना वेळेवर बेड मिळणे आवश्यक असून, रुग्णांना बेडसाठी इतरत्र फिरावे लागू नये. तसेच रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी व डॅशबोर्डचे सनियंत्रण करणे. तसेच हॉस्पिटलमधील बेडचे सुयोग्य पध्दतीने नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेवून सुनियोजित पध्दतीने लोकसहभाग वाढविण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.