दौंड - चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाध्यक्ष महेश पासलकर यांनी केले.
संघटनेचे पदाधिकारी उपस्थित-
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, देविदास धुमाळ, शिव सहकार सेनेचे प्रदीप धुमाळ, महिला आघाडीच्या स्वाती ढमाले, युवासेनेचे दौंड समन्वयक समीर भोईटे, विद्यार्थी सेनेचे दौंड तालुका प्रमुख वैभव शितोळे, तसेच सर्व उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, वार्ड शाखाप्रमुख, शिवसैनिक व सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महेश पासलकर यांचे आवाहन-
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सरकारच्या योजना जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची कामे शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी जोमाने करावीत. तसेच पक्षसंघटना वाढविण्याकरिता गावागावात जाऊन संपर्क करण्याचे आवाहन महेश पासलकर यांनी यावेळी केले.
निवडणुकांमध्ये मोठी चुरस पहायला मिळणार-
ग्रामपंचायत निवडणुका येत्या काळात होणार आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दौंड तालुक्यातील राजकीय पक्ष तयारीला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठी चुरस पहायला मिळणार आहे.
हेही वाचा- 'भारत बंद'ला अण्णा हजारेंचा पाठिंबा; कृषी आयोग लागू करण्याची अण्णांची मागणी