पुणे : पुण्यातील उंड्री परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरीयन तरूणाकडून तब्बल सव्वा दोन कोटींचे कोकेन जप्त केले (Cocaine seized from Nigerian trafficker) आहे. हा व्यक्ती कोकेन विक्रीसाठी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. फॉलरीन अब्दुलअझीज अन्डोई (50, रा. उंड्री. मूळ. रा. नायजेरीया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
कोकेन विक्री : शहरात अंमली पदार्थ तस्करीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून गस्त घालण्यात येत आहे. एक संशयीत नायजेरीयन उंड्री मंतरवाडी रस्ता परिसरात कोकेन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून अन्डोई याला कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल 1 किलो 81 ग्रॅम कोकेन आढळून आले. त्याची बाजारात 2 कोटी 16 लाख 20 हजार एवढी किंमत आहे. त्याच्या ताब्यातून कोकेन, मोबाईल, कार असा तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Anti Narcotics Squad of Crime Branch) आहे.
गुन्हा दाखल : अॅन्डोई हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Cocaine Seized ) आहे. तो 2000 मध्ये कपड्यांचा व्यवसाय करण्यासाठी भारतात आला आहे. सुरुवातीला मुंबईत तो राहत होता. त्यानंतर अमली पदार्थाची तस्करी करून लागला. त्याच्यावर यापुर्वी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच, कस्टम विभागाने त्याला 2014 मध्ये एकदा अटक केली होती. त्यानंतर 2014 मध्ये पुणे पोलीसांनी त्याच्यावर कारवाई केली. तेव्हापासून तो कारागृहात होता. त्यानंतर नूकताच तो जामीनावर बाहेर आला असून त्याने पुन्हा अंमली पदार्थाची तस्करी सुरू केली होती. पोलीसांनी त्याला अटक केली (Cocaine seized from Nigerian trafficker in Pune) आहे.