ETV Bharat / state

सुशांतच्या 'फार्म हाऊस'वर अमलीपदार्थ विरोधी पथकाची तपासणी - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आज पवना धरण येथील 'फार्म हाऊस'वर अमलीपदार्थ विरोधी पथक पोहचले असून दुपारपासून 'हँग आऊट विला' येथे तपासणी सुरू आहे. येथून काही माहिती मिळते का? याची तपासणी केली जात असल्याची माहिती आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Sep 8, 2020, 8:02 PM IST

पुणे - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आज पवना धरण येथील 'फार्म हाऊस'वर अमलीपदार्थ विरोधी पथक पोहचले असून दुपारपासून 'हँग आऊट विला' येथे तपासणी सुरू आहे. येथून काही माहिती मिळते का? याची तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला असून दुपारपासून त्यांनी परिसरातील काही नागरिकांची विचारपूस केल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, ती हत्या की, आत्महत्या यावरून चांगलेच राजकारण पेटले असून ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी आज रियाला 'एनसीबी'ने अटक केली आहे. मुंबईतून आज अमलीपदार्थ विरोधी पथक हे थेट सुशांतच्या लोणावळा येथील पवना धरणाजवळ असलेल्या फार्म हाऊसवर पोहचले. इथे काही धागेदोरे मिळतात का, याविषयी माहिती घेतली जात आहे. याठिकाणी माध्यमांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अद्याप त्या फार्म हाऊसवर तपासणी सुरू आहे.

अभिनेता सुशांतसिंह अनेकदा धावपळीतून विश्रांती घेण्यासाठी या ठिकाणी येत होता. येथील व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. काही वेळेस या ठिकाणी रिया आल्याचे सांगण्यात येत आहे. 'हँग आऊट' हे फार्म हाऊस दोन वर्षांच्या भाडेतत्वावर घेतले होते, अशी माहिती आहे.

हेही वाचा - 'गंभीर आरोप केल्यामुळे सरकारने विधानसभेतून पळ काढला'

हेही वाचा - राज्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियान राबवणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.