ETV Bharat / state

बारामती तालुक्याच्या मुर्टी येथील तरुणाला कोरोनाची बाधा

author img

By

Published : May 20, 2020, 6:24 PM IST

तपासणीत १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून कोरोनाबाधित व्यक्तीच्या १७ वर्षाच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बारामती
बारामती

बारामती - तालुक्यातील मुर्टी येथील एका १७ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईवरून स्वगृही आलेल्या मुर्टी येथील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे रविवारी उघडकीस आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबासह ११ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. सदर तपासणीत १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून कोरोनाबाधित व्यक्तीच्या १७ वर्षाच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मुंबईहून आपल्या मूळगावी मुर्टीत आलेल्या एका व्यक्तीला नुकतेच कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबासह इतर एका कुटुंबाची मुर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली होती. त्या सर्वांचे गृह विलगीकरण करण्यात आले होते. दरम्यान, एकाची प्रकृती बिघडल्याने त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. १७ मे रोजी तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील ६ व मुंबईहून आलेल्या दुसऱ्या कुटुंबातील ४ तसेच येथील आरोग्य केंद्रातील तपासणी केलेला १ अशा ११ जणांना कोरोना तपासणीसाठी बारामतीत पाठविण्यात आले होते. आज त्यातील १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यातील एका १७ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण कोरोनाबाधित रुग्णाचा मुलगाा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून बारामतीत 'बारामती पॅटर्न' राबविण्यात आला. या पॅटर्नला यश येऊन अवघ्या काही दिवसातच बारामती शहर कोरोना मुक्त झाले. मात्र, वेगवेगळ्या कारणांसाठी परगावातून बारामती तालुक्यात येणारे नागरिक वाढू लागल्याने बारामतीच्या ग्रामीण भागात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.