ETV Bharat / state

Filing Charge Sheet in PFI Case : पीएफआय प्रकरणात एटीएसला पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ; आरोपपत्र दाखल करण्याकरिता कोर्टाकडून सवलत - एटीएसला पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ

भारतात बंदी असलेल्या वादग्रस्त संघटना पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या संबंधित पाच संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्याकरिता पुन्हा आणखी 30 दिवसांची मुदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात केली आहे. विशेष न्यायाधीश एएम पाटील यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुन्हा आणखी 15 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. यापूर्वीदेखील 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती.

Another 15-day Extension by Special Court For Filing Charge Sheet to ATS in PFI Case
पीएफआय प्रकरणात एटीएसला पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ; आरोपपत्र दाखल करण्याकरिता कोर्टाकडून सवलत
author img

By

Published : Jan 18, 2023, 8:31 PM IST

मुंबई : पीएफआय प्रकरणात एटीएसने आरोपपत्र दाखल करण्याकरिता आणखी 15 दिवसांची मुदत देण्यात यावी, असा अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात केला होता. यापूर्वीदेखील एटीएसला 30 दिवसांची मुदत आरोपपत्र दाखल करण्याकरिता न्यायालयाने दिली होती. ही मुदत उद्या संपणार असल्याने आज एटीएसकडून आज पुन्हा 15 दिवसांची मुदत देण्यात यावी, असा अर्ज करण्यात आला होता, त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

आरोपींजवळून महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त : एटीएसच्या वतीने संदीप गोलसर्विस यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपींजवळून महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहे. तसेच, फोन कॉल रेकॉर्डदेखील तपासात समोर आले आहे. या प्रकरणात सखोल तपास सुरू असून, आरोपपत्र दाखल करण्याकरिता आणखी 30 दिवसांची मुदत देण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे विशेष सत्र न्यायालयात करण्यात आली होती.

आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत वाढवून : या प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी करीत तपास संस्थेने विशेष न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाचा तपास अजूनही प्रगतीपथावर असल्याचे एटीएसने विशेष न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायाधीश एएम पाटील यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी 15 दिवसांचा अतिरिक्त मुदत वाढवून दिली आहे.

एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली : या संघटनेच्या संबंधित संशयित लोकांनी विरोधात एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मुंबईतील मालाड, भिवंडी, कांदिवली, पालघर आणि कुर्ला या परिसरांमधून संशयित पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मजझर खान, सादिक कुरेशी, असिफ खान, मोहम्मद इकबाल खान आणि मोमीन मिस्त्री या आरोपींचा समावेश आहे. महाराष्ट्र एटीएसने युएपीए देशविरोधी गतीविधी आणि आयपीसीच्या कलम 120बी, 121-ए, 153-ए आणि यूएपीए कायदा 13(1) अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएस युनिट 10 विक्रोळीच्या वतीने या आरोपींना अटक करण्यात आले आहे.

पीएफआयच्या कार्यालयावर छापे : राज्यातल्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत एनआयएने एटीएसच्या मदतीने पीएफआयच्या कार्यालयावर छापे मारले. त्यात राज्यात पीएफआयशी संबंधित 20 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर देशभरातून आतापर्यंत एकूण 106 जणांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईच्या नेरुळमध्येही रात्री तीन वाजल्यापासून NIA ची छापेमारी सुरू आहे. सेक्टर 23 मधल्या PFI च्या कार्यालयावर NIA ने छापा टाकलाय. प्यॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 5 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

हेही वाचा : Shubman Gill Double Ton: शुभमन गिलने रचला इतिहास.. वनडेमध्ये दुहेरी शतक करणारा भारताचा पाचवा फलंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.