पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी उतरविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून खासदार बापट हे आजारी असताना अशा पद्धतीने बापट यांना प्रचारात उतरविल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावर हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपला धोका ? : गेल्या काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट हे आजारी असून सर्वच पक्षीय नेते मंडळीकडून त्यांची विचारपूस करण्यात येत आहे. अशातच कसबा मतदार संघात भाजपला धोका निर्माण भीती असल्याने भाजपने आजारी बापट यांना मैदानात उतरविले. खासदार गिरीश बापट यांना भाजपने मैदानात उतरविल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे. यावर हिंदू महासंघाचे उमेदवार आंनद दवे यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपचा मतांसाठी भावनीक प्रयत्न : युद्धात एक संस्कृती जपली जाते. जखमी सैन्याला देखील मार लागल्यानंतर त्याची विचारपूस केली जाते. त्याला औषधोपचार केले जातात.असे असताना जे पर्रीकरांच्या बाबतीत झाले, तेच आज बापट यांच्या बाबतीत होत आहे. लोकांना इमोशनलकरून मत बदलण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. ते त्याच्यात अपयशी ठरणार आहे. अशा परिस्थितीत गिरीश बापट यांना प्रचारात आणले जात असेल तर, ते खूप दुःखद असल्याचे दवे म्हणाले.
प्रचाराचा जोर वाढला : कसबा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली असून प्रत्येक पक्षाने प्रचारात जोर लावला आहे. भाजपचे नेते मंडळी पुण्यात ठाने मांडून बसले आहेत. घरोघरी प्रचारावर जोर देत असून विविध नेते मंडळी हे सभा घेत आहे. तर, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते मंडळी देखील सभा, रॅली, रोड शो घेत प्रचार करत आहे. अशातच हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी देखील जोर लावला असून ते देखील घरोघरी प्रचार करत आहे.