पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाला शिरूर मतदार संघातून सुरुवात होणार आहे. याबाबत अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, "मी मुख्यमंत्री यांचं स्वागत करतो. शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसंकल्प अभियानाला सुरवात शिरूरमधून करत आहेत. जर हा शासकीय कार्यक्रम असता तर खूपच जास्त आनंद झाला असता." मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हीच विनंती आहे की, कांद्याच्या निर्यात बंदीच आमच्या शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. त्याबाबत ठोस पाऊल उचला. केंद्राकडे आवाज उठवा अस म्हणत अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री यांच्या शिवसंकल्प अभियानावर टीका केली आहे.
महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं काम : यावेळी अमोल कोल्हे यांना नवीन वर्षाच्या संकल्पबाबत विचारलं असता ते म्हणाले की "शिरूर मतदार संघात अनेक नवीन प्रकल्प होत आहेत. हे सर्व नवीन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत. तसेच निवडणुका हे तर फक्त एक माध्यम आहे. सत्ता आणि पद हे एक साधन आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं काम केलं पाहिजे. शेतकरी आणि स्त्रियांचा सन्मान व्हावं हेच माझं संकल्प असणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल.
प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणार नाही : अजित पवार यांनी टीका केली आहे. त्याबाबत खासदार कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की "मी याआधीदेखील सांगितलं आहे. अजित पवार हे एक मोठे नेते आहेत. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पुढे जे काही होईल ते मायबाप जनता ठरवणार आहे. मग काय होईल ते पाहू. महाराष्ट्रातील काही प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. त्याबाबत अमोल कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की "जे फॉक्सकॉन वेदांतबाबत देखील सरकारनं असंच आश्वासन दिलं होत. हे प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणार नाहीत. सध्या राज्य सरकार केंद्र सरकारला आमच्या ताटातील तुम्ही हिसकावून घेऊ नका, अस सांगत नाही. हे खूप दुर्दैवी आहे."
हेही वाचा :