पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीला वंदन करण्यासाठी आज मी किल्ले शिवनेरीवर आलो आहे. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे येत आहे. मला येऊन या भूमीला वंदन करायचे आहे, म्हणून मी आज लवकर आलो आहे. तसेच पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 11 वाजता शिवसृष्टीचा कार्यक्रम असल्याने तिथे देखील जायचे आहे, म्हणून मी लवकर आलो आहे. यावेळी पाटील यांना खासदार अमोल कोल्हे यांच्या बाबतीत विचारले, आज काहीही राजकीय बोलायला नको, असे यावेळी पाटील म्हणाले.
भगवा जाणीव आंदोलन : खासदार अमोल कोल्हेंच्या या आंदोलनाला आमदार अतुल बेनके यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला आहे. आजच्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमाला कोल्हे यांनी बहिष्कार घातला आहे. आज सकाळीच किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून कोल्हे यांनी भगवा जाणीव आंदोलन हाती घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लागावा, या मागणीसाठी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आक्रमक झाले आहेत.
शिवाजी महाराज हे भारताचे आराध्य : खासदार अमोल कोल्हे यांची मागणी कोणतीही राजकीय मागणी नसून ती सर्व शिवभक्तांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला माझा देखील जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी बेनके यांनी सांगितले. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीला कायमस्वरूपी भगवा फडकवावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. वारंवार मागणी करुन देखील सरकार मागणीकडे लक्ष देत नसल्याने अमोल कोल्हे आक्रमक पहायला मिळता आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे आराध्य दैवत आहेत.
केंद्रीय मंत्र्यांना वारंवार विचारणा : शिवनेरीवर भगवा फडकवण्याची शिवभक्तांची मागणी ही केवळ पीएसआयच्या एका नियमामुळे होत नाही. त्यामुळे याबाबत मी केंद्रीय मंत्र्यांना वारंवार विचारणा केली आहे. संसदेच्या अधिवेशनातही ही मागणी फेटाळण्यात आली. मात्र, सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत याबाबत चर्चा केली. परंतु ही मागणी मान्य न झाल्याने भगवा जाणीव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लागावा, या मागणीसाठी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आक्रमक झालेले दिसून येत आहेत.
हेही वाचा : Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवासाठी 21 फूट लांब कवड्यांची खास माळ; विश्वविक्रमात नोंद