ETV Bharat / state

Ambadas Danve on Nagpur Rain: 'मोठ्या घरचा पोकळ वासा'...नागपूरच्या पावसावर अंबादास दानवेंची सरकारवर टीका - Pune news

Ambadas Danve on Nagpur Rain : नागपूरमध्ये पावसाचं रौद्ररुप पाहायला मिळालंय. पावसामुळं नागपूर शहराची अवस्था अत्यंत दयनीय झालीय. यावरून विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केलीय.

Ambadas Danve on Nagpur Rain
अंबादास दानवे यांचा माध्यमांशी संवाद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 4:32 PM IST

अंबादास दानवे यांचा माध्यमांशी संवाद

पुणे Ambadas Danve on Nagpur Rain : पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळं नागपूर शहरात अनेक भागात गुडघाभर पाणी साचलं होतं. पावसामुळं नागपूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. नागपूर येथे झालेल्या मुसळधार पावसावर विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, पावसाळ्यात मुंबई नेहमी तुंबते. स्थलांतरित करावं लागतं, असे नेहमी मुंबई शहराबद्दल आरोप होतात. पण आता नागपूरची अवस्था बघितली, तर ग्रामीण भागातील 'मोठ्या घरचा पोकळ वासा' या म्हणीसारखी दिसतेय. हा पोकळपणा नागपूरच्या नेतृत्वात दिसतोय. नागपूरमधील जनता एका मोठ्या पावसानं अस्वस्थ झालीय. अजून तर खूप पाऊस व्हायचा आहे. दुसऱ्यावर आरोप करताना स्वत:च्या खाली काय जळतंय, ते पाहिलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. नागपूरच्या जनतेला लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे, असं देखील यावेळी दानवे म्हणाले.

सरकारचं लक्ष नाही : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध गणेश मंडळांना भेट दिलीय. तसंच शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या घरी देखील भेट देत बाप्पाची आरती केलीय. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. राज्यातील दुष्काळाबाबत ते म्हणाले की, दुष्काळ पडत असताना अवेळी पाऊस पडणं हा देखील दुष्काळ आहे. सरकार कुठेही लक्ष देत नाहीय. विमा कंपनी काही करत नाही. दुर्देवानं टँकरनं पाणी द्यावं लागतंय. सरकार 'शासन आपल्या दारी'ची घोषणा करतंय. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांची यादी समोर आलीय. हे सरकार आल्यापासून आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, अशी टिका यावेळी अंबादास दानवे यांनी केलीय.

सरकार संवेदनाहीन : यावेळी विरोधी पक्ष कुठेतरी कमी दिसत आहे का, असं यावेळी दानवे यांना विचारलं असता ते म्हणाले की, विरोधीपक्ष सगळीकडे जात आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झालं आहे. हे सरकार संवेदनाहीन झालंय. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. दिल्लीत नुसते मुजरे करणे, तळवे चाटणे आणि हुजरेगिरी करणे, एवढंच ते करत आहे, असा टोलाही दानवेंनी लगावलाय

गौतम अदानी भ्रष्टाचारी : केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा आज मुंबई दौऱ्यावर आहे. यावर दानवे म्हणाले की, मुंबईत येण्याआधी ते अदानी यांना भेटून आले. आशिष शेलार यांना कोणीही विचारत नाही. भाजपा अमित शहा यांच्या मुंबई दोऱ्याला वादळ म्हणत असेल, तर ते पालापाचोळा देखील नाही. तसंच गौतम अदानी भ्रष्टाचारी आहेत, ही आमची भूमिका आहे, असं दानवे म्हणाले.

कायदेशीर लढाई सुरूच : 16 आमदार अपात्रतेबाबत दानवे म्हणाले की, आमची कायदेशीर लढाई सुरूच आहे. राहुल नार्वेकर भाजपा नेते आहेत. विधानसभा अध्यक्ष पद हे निष्पक्षपणे काम करण्याची जागा आहे. पणं ते सध्या करत नाही. ते राजकीय हेतूनं काम करत आहे. ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाही, असं देखील यावेळी दानवे म्हणाले.

हेही वाचा :

  1. Ambadas Danve On Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीसाठी शेकडो कोटी रुपयांचा चुराडा - अंबादास दानवेंची टीका
  2. Ambadas Danve on Maratha Reservation : मुख्यमंत्री दिल्लीत जातात उपमुख्यमंत्री दहीहंड्या फोडतात, मात्र...; दानवेंचा सरकारवर घणाघात
  3. Ambadas Danve on G 20: 'जी 20' चा आपल्या देशात डांगोरा का पिटला जातोय- अंबादास दानवेंचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.