ETV Bharat / state

संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोना महामारीचे संकट; अनेकांवर उपासमारीची वेळ

आठ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे माऊलींचे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मंदिर परिसरातील व्यवसाय ठप्प होऊन अर्थकारण ठप्प झाले. दुकानातील माल टाकून देण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आणि सध्या सुरू असलेल्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी दुकानदारांनी नव्याने माल भरला. मात्र, संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर पुन्हा दुकाने बंद राहणार असल्याने संपूर्ण माल वाया जाण्याची वेळ व्यावसायिकांवर येणार आहे.

आळंदी
आळंदी
author img

By

Published : Dec 6, 2020, 3:30 PM IST

आळंदी (पुणे) - तीर्थक्षेत्र देवाच्या आळंदीत कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा कोरोनामुळे मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. या कालावधीत प्रशासनाकडून आळंदीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आळंदीतील पान, फुले, हार, प्रसाद विक्री, पेढे, खेळणी, पूजेचे साहित्य व इतर व्यवसाय बंद राहणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक व्यावसायिकांना सरकारच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत.

संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोना महामारीचे संकट

कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली

आषाढी व कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा आळंदी शहराचा आर्थिक कणा मानला जातो. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे माऊलींचे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मंदिर परिसरातील व्यवसाय ठप्प होऊन अर्थकारण ठप्प झाले. दुकानातील माल टाकून देण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आणि सध्या सुरू असलेल्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी दुकानदारांनी नव्याने माल भरला. मात्र, संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर पुन्हा दुकाने बंद राहणार असल्याने संपूर्ण माल वाया जाण्याची वेळ व्यावसायिकांवर येणार आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा...

तीर्थक्षेत्र आळंदी येथे संजीवन समाधी मंदिराच्या आजूबाजूला दोनशेहून अधिक छोटी-मोठी दुकाने आहेत. यामध्ये पाने-फुले, प्रसाद, हार, खेळणी, तुळशीच्या माळा आदी वस्तू विक्री केल्या जातात. व्यावसायिकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर आहे, मात्र गेल्या आठ महिन्यांपासून अर्थकारण बंद आहे, त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज, हप्ते, व्याज त्याचबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह हे सारे अर्थकारण करायचे कसे? असा गंभीर प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.

पुन्हा संचारबंदी का?

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका धुमधडाक्यात करण्यात आल्या. यावेळी राजकीय पक्षांनी गर्दी करत सर्वत्र सभा घेतल्या, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आता आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळा होत असताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका आळंदी विकास मंचाचे अध्यक्ष संदीप नाईकरे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.