ETV Bharat / state

लॉकडाऊन वाढवण्याचा अधिकार राज्यांना दिला जाण्याची शक्यता, राज्यासाठी लवकरच पॅकेज - अजित पवार - पुणे कोरोना न्यूज

चार टप्प्यातील लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर 5 व्या टप्प्यातील लॉकडाऊन लागू करण्याबाबत केंद्र सरकार राज्य सरकारांना अधिकार देईल, असे वाटत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकार लवकर पॅकेज जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ajit pawar
अजित पवार
author img

By

Published : May 29, 2020, 3:47 PM IST

पुणे- महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन वाढणार की काय होणार याविषयी अनेकांच्या मनात भीती आहे. यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा अधिकारी राज्यांना दिला जाईल, असे वाटत असल्याचे म्हटले आहे ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

लॉकडाऊन वाढवायचा का नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना दिला जाईल, असे वाटत असल्याचे अजित पवार म्हणले. 20 लाख कोटी रुपये कोणाला भेटणार याबाबत अनेक मत प्रवाह आहेत. पॅकेजमध्ये फक्त मोठे मोठे आकडे आहेत, असे काहीजण म्हणत असल्याची टीकाही पवार यांनी केली.

राज्यासाठी लवकरच पॅकेज - अजित पवार

राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज देणार

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करेल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. लाखो मजूर परत गेलेत त्यांची वाट बघण्यापेक्षा आता स्थानिकांनी काम मिळविण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी स्कील देण्याची गरज असेल तर राज्य सरकार त्यासाठी तयार आहे. त्यातून बेरोजगारी कमी होईल.

आषाढी वारी संबंधी लोकभावनेचा आदर करून आषाढी वारीवर ओढवलेले कोरोनाचे संकट लक्षात घेऊन त्या संदर्भात आज निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.