ETV Bharat / state

Ajit Pawar in Pune : निडवणूक आयोग जो निर्णय देईल तो मला मान्य; उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच बोलले - छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श

Ajit Pawar in Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य असेल, असं म्हटलंय.

Ajit Pawar in Pune
Ajit Pawar in Pune
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 2:54 PM IST

पुणे Ajit Pawar in Pune : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संघर्ष निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. यावर निडवणूक आयोग जो निर्णय देईल तो मला तरी मान्य असेल असं अजित पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार तेव्हा बारामतीत होते. यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत अमित शाहांच्या कार्यालयाला मी कळवलं होतं, अशी माहिती अजित पवारांनी दिलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी पुण्यातील विविध गणेश मंडळांना भेट दिली. तत्पुर्वी त्यांच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

मी फक्त विकासाचा विचार करतो : ज्या दिवसापासून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या पसरत आहेत. त्यांना मुख्यमंत्री होऊन आता 14 महिने झाले. प्रत्येक यंत्रणा त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच काम करत आहे. मुख्यमंत्री बदलण्याच्या बातम्यांना काहीच अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. तसंच जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत असली चर्चा मी करत नाही. मी विकासचं काम करत असतो असं यावेळी अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम : आरक्षणावरुन वाद सुरू असतानाच मुस्लिम आरक्षणावर अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. मी काम करताना सगळ्यांचा विचार करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम करतो आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेच्या रस्त्याने पुढे जात असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय.

असा कुठलाही प्रस्ताव नाही : राज्याचं उत्पादन वाढवण्यासाठी दारुचे परवाने देण्याचा प्रस्ताव सरकारकडे आल्याची चर्चा सुरू होती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण देत असा कुठलाही प्रस्ताव आला नसून 1972 नंतर कुठलीही नवीन दुकानं दिलेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकसंख्या वाढली मात्र दुकानं दिलेली नाहीत. आपल्याला त्या रस्त्यानं जायचं नाही, असं अजित पवार कानाला हात लावत म्हणाले.

हेही वाचा :

  1. MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज; दोन्ही गटांना नोटीस
  2. Conflict in NCP : राष्ट्रवादीतील दोन्ही गटात संघर्ष वाढला, तर विरोधी पक्षनेत्यांची विधानसभा अध्यक्षांकडं 'ही' मागणी
  3. MLA Disqualification Case : ठरलं! 'या' तारखेपासून आमदार अपात्रतेसंदर्भात होणार सुनावणी; राहुल नार्वेकरांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.