बारामती - काहीजण समाजात वितृष्ट आणण्याचा आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कारण नसताना भोंग्याचे राजकारण करत आहेत. कोणाच्याही भावना न दुखवता सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्या-गोविंदाने रहावे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
न्यायालयाने भोंग्यायासंदर्भात जे नियम सांगितले आहे. त्यानुसार आपणा सर्वांना पुढे जावे लागेल. त्याचे अनुकरण आपण सर्वजण करू. मात्र भोंग्यावरून एकमेकांबाबत आकस, गैरसमज, जातिभेद करून चालणार नाही. ही आपली परंपरा नाही. आपल्या वडिलधार्यांची शिकवण नाही, असे म्हणत आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही लोक असे वक्तव्य करतात. तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा राजकारणामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हणाले.