ETV Bharat / state

सूर्यमुखींनी लवकर उठावे.. अजित पवारांच्या जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या - अजित पवार

दादा ज्या गतीने काम करतात त्या गतीने मी नाही करू शकत, पण दादांच्या मागे मागे धावण्याचा प्रयत्न आहे. दादांनी सकाळी 10 चा कार्यक्रम लावला, दादा जरा आमचा विचार करा आम्हाला 6 -7 तास झोप लागते. त्यामुळे या पुढचा कार्यक्रम 11 वाजता घ्या, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली. यावर अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले.

pune
अजित पवारांच्या जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या म्हणाले... सुर्यमुखींनी लवकर उठावे
author img

By

Published : Feb 9, 2020, 4:23 PM IST

पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुण्यातील कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सकाळी लवकर उठून कामाला लागण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. अर्थात जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी जरा उशिराने कार्यक्रम ठेवा, अशी विनंती अजित पवारांना आपल्या भाषणातून केली होती. मात्र, पवारांनी त्यांनाच लवकर उठून काम सुरू करा, असा मिश्किल टोला लगावला आहे.

अजित पवारांच्या जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या म्हणाले... सुर्यमुखींनी लवकर उठावे

हेही वाचा - 'जनतेची कामे तातडीने झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा नाहीतर...'

आपल्या भाषणात आव्हाड म्हणाले, दादा ज्या गतीने काम करतात त्या गतीने मी नाही करू शकत, पण दादांच्या मागे मागे धावण्याचा प्रयत्न आहे. दादांनी सकाळी 10 चा कार्यक्रम लावला, दादा जरा आमचा विचार करा आम्हाला 6 -7 तास झोप लागते. त्यामुळे या पुढचा कार्यक्रम 11 वाजता घ्या, अशी विनंती त्यांनी केली. यावर अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर देत सूर्यमुखी असणाऱ्यांनी जरा लवकर उठायची सवय लावा. मी पवार साहेबांकडे पाहून तसे वागण्याचा प्रयत्न करतो. जितेंद्र आव्हाड तुम्ही ही जरा लवकर उठून कामाला लागत चला, असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा - ' मी पंढरपूरला दर्शनाला जातो.. पण त्याचे राजकारण करत नाही'

यावेळी बोलताना पवारांनी पुण्यातील शिवाजीनगर गणेशखिंड रस्त्यावरील 3 उड्डाणपुल काढून दुमजली मार्ग करावा, अशी मागणी वाढत असल्याचे सांगत मेट्रोचा विचार करून नवीन पूल उभारण्यासंदर्भात विचार सुरू आहे, असे सांगितले. पवार पुढे म्हणाले की, आपण हे काम आज केले नाही तर, पुढील 50 वर्ष आपल्याला नावे ठेवली जातील. मागील चुका सुधारण्याची संधी आहे. त्यामुळे पुणेकरांनी थोडी गैरसोय, त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी असे पवार म्हणाले. तसेच विकास प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची कमतरता आमचे सरकार पडू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:जितेंद्र आव्हाड सकाळी लवकर उठून कामाला लागा, अजित पवारांचा सल्लाBody:mh_pun_02_ajit_pawar_on_jitendra_avhad_avb_7201348

anchor
पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण च्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सकाळी लवकर उठून कामाला लागण्याचा सल्ला देखील अजित पवारांनी दिला...अर्थात जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी जरा उशिराने कार्यक्रम ठेवा असे आर्जव अजित दादांना आपल्या भाषणात केले होते मात्र अजित दादांनी त्यांनाच लवकर उठून काम सुरू करा असा मिश्किल टोला लगावला....आपल्या भाषणात जितेंद्र आव्हाड म्हणाले, दादा ज्या गतीने काम करतात त्या गतीने मी नाही करू शकत, पण दादांच्या मागे मागे धावण्याचा प्रयत्न आहे. दादांनी सकाळी 10 चा कार्यक्रम लावला, दादा जरा आमचा विचार करा आम्हाला 6/7 तास झोप लागते त्यामुळे या पुढचा कार्यक्रम 11 वाजता घ्या असे आर्जव केले त्याला
अजित पवारांनी त्यांच्या स्टाईल ने उत्तर दिले.....सूर्यमुखी असणाऱ्यांनी जरा लवकर उठायची सवय लावा. मी पवार साहेबांकडे पाहून तसे वागण्याचा प्रयत्न करतो, जितेंद्र आव्हाड तुम्ही ही जरा लवकर उठून कामाला लागत चला असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा उमटला....यावेळी बोलताना अजित पवारांनी पुण्यातील शिवाजीनगर गणेशखिड रस्त्यावरील 3 उड्डाणपुलं काढून दुमजली मार्ग करावा अशी मागणी वाढत असल्याचे सांगत
मेट्रो चा विचार करून नवीन पूल उभारण्या संदर्भात विचार सुरू आहे आपण हे आज केलं नाही, तर पूढील 50 वर्ष आपल्याला नावं ठेवली जातील, मागील चुका सुधारण्याची संधी आहे त्यामुळे पुणेकरांनी थोडी गैरसोय, त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी असे अजित पवार म्हणाले तसेच
विकास प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची कमतरता आमचं सरकार पडू देणार नाही असे ही त्यांनी सांगितले.....
Byte अजित पवार, उपमुख्यमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.