ETV Bharat / state

Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की लगेच राजीनामा देतो ; होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी - अब्दुल सत्तार - Abdul Sattar

सिल्लोडमधून मी राजीनामा देतो तुम्ही वरळीतून द्या , असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी (Agriculture Minister Abdul Sattar) आदित्य ठाकरे यांना केले (Abdul Sattar criticize Aditya Thackeray) होते. मी पण माझ्या मतदार संघातून राजीनामा देतो. आणि आपली पहिलीच टेस्ट होऊन जाऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊन द्या. त्यांनी जर राजीनामा नाही दिला, तर मी आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की लगेच राजीनामा देतो. असे यावेळी सत्तार म्हणाले.

Agriculture Minister Abdul Sattar
कृषी मंत्री अब्दुल सत्तार
author img

By

Published : Nov 1, 2022, 3:10 PM IST

पुणे : सिल्लोडमधून मी राजीनामा देतो तुम्ही वरळीतून द्या , असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी (Agriculture Minister Abdul Sattar) आदित्य ठाकरे यांना केले (Abdul Sattar criticize Aditya Thackeray) होते. यावर सत्तार यांना आवाहन काय आहे ? याबाबत विचारलं असता ते म्हणाले की- माझं आवाहन हेच आहे. मुख्यमंत्र्यांकडे काही काळासाठी ते अडलेले आहे. त्यांच्या नेत्यांचे म्हणणे होते की - गद्दार आमदारांना 2 वर्षानंतर कळेल की काय असते निवडणूक ? मी म्हणतोय 2 वर्ष कश्याला, आत्ताच तुम्ही राजीनामा द्या. मी पण माझ्या मतदार संघातून राजीनामा देतो. आणि आपली पहिलीच टेस्ट होऊन जाऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊन द्या. त्यांनी जर राजीनामा नाही दिला, तर मी आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की लगेच राजीनामा देतो. असे यावेळी सत्तार म्हणाले.

प्रदर्शनाची पाहणी : केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांच्या उपस्थितीत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, पुणे येथे 'हॉर्टिकल्चर व्हॅल्यू चेन फंक्शन' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याच उद्घाटन तोमर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रदर्शनाची पाहणी करताना सत्तार बोलत (Abdul Sattar in Pune criticize) होते.

प्रतिक्रिया देताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर शेतकऱ्याना किती मदत दिली जाणार आहे. याबाबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारल असता, ते म्हणाले की- देशाच्या कृषी विभागाच्या वतीने मिळणारी मदत तसेच राज्याकडून मिळणारी मदत व्यतिरिक्त एनडीआरएफचे नियम त्यात 75 आणि 25 टक्के हा आपला वाटा असतो. आणि 75 टक्के केंद्राचा वाटा असतो. याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापेक्षा जास्त मदत (Agriculture Minister Abdul Sattar in Pune) केली.

शेतकऱ्यांना मदत : मागच्या महिन्यात जे नुकसान झाले. त्याची पाहाणी करून 3 हजार 501 कोटी तसेच अश्या पद्धतीने साडे चार हजार कोटी एवढी मदत केली. देशात महाराष्ट्र पहिले असे राज्य आहे, जिथे जुलैमध्ये नुकसान होते आणि त्याची मदत सप्टेंबरमध्ये मिळाली. सध्या जे राज्यातील विविध भागात नुकसान झाले आहे. त्याची अंतिम आकडेवारी येत आहे. जेवढ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तेवढ्या शेतकऱ्यांना मदत ही दिली जाणार आहे. कोणताही शेतकरी हा वंचित राहणार नाही. ज्या पद्धतीने पहिल्या पावसात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि त्याला मदत मिळाली, तशीच मदत आत्ताही केली जाणार आहे असे यावेळी सत्तार म्हणाले.

ओल्या दुष्काळाची मागणी : विरोधी पक्षाकडून ओल्या दुष्काळाची मागणी केली जात आहे. यावर सत्तार यांना विचारलं असता ते म्हणाले की -विरोधी पक्षाला काय बोलायचं आहे, काय नाही तो त्यांचा अधिकार आहे. सत्ताधारी पक्षाला सत्ता टिकवण्यासाठी तसेच बाकीच्या योजना देखील पोहचवण्यासाठी तसेच नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून सुटणार नाही. ओला दुष्काळ जाहीर केला की- 32 टक्के उसाचा क्षेत्र राज्यात आहे. मग त्यांनाही मदत द्यायची का ? त्यांना जर दिली तर ज्यांचे नुकसान झाले त्यांचे काय हाल होणार आहे ? असे देखील यावेळी सत्तार (Abdul Sattar criticize Uddhav Thackeray) म्हणाले.

दुष्काळाची परिस्थिती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत सत्तार यांना विचारले असता, ते म्हणाले की - त्यांचा दौरा पहिला त्यांच्या वडिलांचा दौरा पहिला. त्यांचे वडील आमच्या औरंगाबाद येथे आले. अडीच तासाच्या दौऱ्यात 24 मिनिटे शेतकऱ्यांशी बोलले. आम्ही 24 दिवसांपासून फिरतोय आम्हाला अजूनही ओला दुष्काळाची परिस्थिती दिसली नाही. यांना 24 मिनिटांमध्ये काय दिसले असेल ते मला माहीत नाही. परंतु राजकारणासाठी बांधावर जाऊन फोटो काढणे वेगळे आहे. ते स्वतः जेव्हा शेतकरी होते, तेव्हा त्यांनी 2019 मध्ये अनेक घोषणा केल्या. पण त्याची त्यांना आठवण राहिली नाही. अशी टीका देखील सत्तार यांनी यावेळी केली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.