ETV Bharat / state

दारू प्यायल्यानंतर दोघांनी केला मित्राचा खून; कारण अस्पष्ट - पुणे गुन्हेवार्ता

एका संशयित आरोपीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी फरार असून शोध घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दारू प्यायल्यानंतर दोघांनी केला मित्राचा खून; कारण अस्पष्ट

author img

By

Published : May 17, 2020, 10:37 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये दोन मित्रांनी मिळून मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष कुलकर्णी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून एका संशयित आरोपीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी फरार असून शोध घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दारू प्यायल्यानंतर दोघांनी केला मित्राचा खून; कारण अस्पष्ट

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात दुपारी पाचच्या सुमारास एकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पिंपळे गुरव परिसरातील सृष्टी चौक रस्त्यावर तीन मित्र दारू प्यायले. त्यांच्यात वाद झाला आणि संतोष कुलकर्णी नावाच्या मित्राच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, दोन्ही मित्र फरार झाले होते. पैकी एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे, तर दुसरा फरार झाला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली आहे. दरम्यान, खून करण्यामागील नेमके कारण पुढे आले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.