पुणे - होय मी सावरकर भक्त आहे. ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तर हा वाद ज्यांना कायम ठेवायचा आहे त्यांना सावरकर कधीच कळू शकणार नाहीत, असे वक्तव्य अभिनेते विक्रम गोखले यांनी केले आहे.
हेही वाचा - सावरकरांवरील वादग्रस्त लिखाणाचा रत्नागिरीतील सावरकरप्रेमींकडून निषेध
गोखले यांनी यावेळी सोनिया आणि राहूल गांधींवरही कठोर टीका केली आहे. गोखले म्हणाले, "मी सावरकर माहित असलेला माणूस आहे. त्यांचे साहित्य, काव्य मी वाचले आहे. सोनिया गांधींना सावरकरांवर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही" सोनिया आणि राहूल गांधींनी सावरकरांचे कोणते साहित्य वाचले आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. सावकरांनी केवळ आपले समाजहिताचे काम सुरू ठेवण्यासाठी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असेही ते म्हणाले आहेत.