पुणे - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेने राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. यावर अभिनेते सोनू सूद याने देखील आपले मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला की जेव्हा लोकांच्या समोर समस्या होत्या. भारतात ऑक्सिजनची जेव्हा समस्या होती तेव्हा कोणीही धर्म, जात आणि भाषेबद्दल बोलत नव्हता. तेव्हा सर्वजण एकमेकांना मदत करत होते. त्या काळाने संपूर्ण भारताला जोडले होतं. आज हे जोडलेलं नातं कधीच तुटता कामा नये. माझी सर्वांना विनंती आहे की आज वेळ अशी आहे की ज्यात आपण येणाऱ्या पिढीला असा संदेश द्यायला पाहिजे की प्रत्येक जाती, धर्माच्या पलीकडे जाऊन आपण मदत केली पाहिजे. जितो कनेक्ट 2022 या कार्यक्रमात अभिनेता सोनू सूद उपस्थित होता यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
मानवतेचा आवाज ऐकायचा - जेव्हा आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवतेबाबत बोलू, तेव्हा भोंग्यावर अजान होऊ द्या किंवा हनुमान चालीसा होऊ द्या हे कळणार नाही. तेव्हा प्रत्येकाला मानवतेचा आवाज ऐकायला मिळणार आणि तोच आवाज नेहमी ऐकायला यायला पाहिजे, असं देखील यावेळी सूद म्हणाला.
हेही वाचा - Avinash break record : मराठमोळ्या अविनाशने ३० वर्षे जुना ५००० मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला
मला हिरोचा रोल मिळत नाही - मला इथं येऊन खूप चांगलं वाटलं. मी याआधी देखील जितो बरोबर असोसिएट राहिलो आहे. फिल्म जगात काम करताना ते एक प्रोफेशनल आहे. पण खरं आयुष्य हे लोकांबरोबर राहून आहे. जो आनंद लोकांबरोबर राहताना आणि त्यांच्याबरोबर काम करताना येतो तो आंनद जगातील कोणत्याही चित्रपटात भेटत नाही, असं यावेळी अभिनेता सोनू सूद याने सांगितले. पुढं खूप काम करायचं आहे. तसेच माझी इच्छा असताना देखील मला हिरोचे रोल मिळत नाही, असे देखील यावेळी सोनू सूद म्हणाला.