ETV Bharat / state

Pune Crime News : मंदिरातील घंटा चोरी करणारा आरोपी अटक, यासाठी केली चोरी

पुणे शहरात कधी काय घडेल याचा नेमच नाही. कोंढवा परिसरातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातून घंटा चोरी करणाऱ्या एका रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली. त्याने आर्थिक अडचणीमुळे मंदिरातून घंटा चोरल्याची कबुली दिली आहे.

Pune Crime News
मंदिरामधील घंटा चोरी
author img

By

Published : Jun 22, 2023, 10:31 PM IST

मंदिरातील घंटा चोरी करताना तरूण

पुणे : पुणे तिथे काय उणे याची प्रचिती ही नेहमीच विविध माध्यमातून येत असते. आर्थिक अडचण माणसाला आल्यास माणूस कोणत्याही थराला जातो. असाच काहीसा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे. आर्थिक अडचण आल्याने एका रिक्षाचालकाने चक्क कोंढवा भागातील भैरवनाथ मंदिरामधील घंटा चोरी केली.

मंदिरामधील घंटा चोरी : याबाबत कोंढवा पोलिसांनी सोहेल इलियाज शेख, वय २५ वर्षे, राहणार वडारवाडी, गोलंदाज चौक, शिवाजीनगर, याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा भागातील भैरवनाथ मंदिरामधील घंटा चोरी गेल्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध पोलिसांच्या वतीने घेण्यात येत होता. घटनास्थळाच्या आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध पोलीस घेत होते.

मंदिरातून घंटा चोरल्याची कबुली दिली : अनोळखी आरोपी याने रिक्षा रिक्षा क्र. एम.एच.१२ क्यु. आर. ६०७८ मधून घंटा चोरी करून नेत असल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून निष्पन्न झाले. या रिक्षा मालकाचा शोध घेवून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याने त्याची रिक्षा ही सोहेल इलियाज शेख, यास चालविण्यासाठी दिली असल्याचे सांगितले. या आरोपीचा शोध घेत असताना तो लुल्लानगर भागात भाडे सोडण्यासाठी आल्याबाबत माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. तेव्हा त्यास वरिष्ठ स्टाफच्या मदतीने पकडून ताब्यात घेवून त्याच्याकडे चोरीबाबत तपास केला. त्याने आर्थिक अडचण असल्याने घंटा चोरी केली असल्याचे सांगून ती त्याच्याच रिक्षाच्या मागील बाजूस डिकीत लपवून ठेवल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -

  1. Wine Shop Theft Case: डोंबिवलीत वाईन शाॅपच्या गल्ल्यातील ८ लाखाची रोकड पळविणाऱ्या तिघांना अटक
  2. Bike Thief Arrested: चोरांचा शौक 'लई भारी', फक्त 'याच' मॉडेलच्या गाड्या चोरायचे; अखेर अटक
  3. Theft Shilpa Shetty House : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात चोरी करणाऱ्यांना अटक, तिहेरी सुरक्षा भेदून 25 फूट भिंतीवर चढून चोरट्यांनी केला घरात प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.