पुणे: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी ( Throwing ink on Minister Chandrakant Patil ) तिघांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शाई फेक करणाऱ्या तिघांवर राजकीय दबावापोटी 307 सारखे गंभीर कलम लावले आहे. याच्याविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत, असे आरोपींचे वकील सचिन भोसले यांनी सांगितले आहे. तिन्ही आरोपींना आज मोरवाडी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना पिंपरी- चिंचवडमधील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टाच्या आवारात सर्वपक्षीयांनी शाइफेक करणाऱ्या व्यक्तीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत त्यांच्यावर लावण्यात आलेले कलम हटवावे, अशी मागणी केली.
शाईफेक करणाऱ्यांचे समर्थन?: शनिवारी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरातून चहा घेऊन निघालेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तिघांनी शाईफेक केली. यानंतर तीन जणांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, आरोपींवर 307 सारखे गंभीर कलम लावण्यात आल्याने सर्वपक्षीयांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असा आरोप करत मोरवाडी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली.
तीन दिवसांची पोलिस कोठडी: आज मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (पद समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ यांना कोर्टात हजर केले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आली आहे. आरोपींवर 307 कलम लावून त्यांना अडकवले आहे. हा गुन्हा त्यांच्यावर दाखल होत नाही, असे आरोपींचे वकील सचिन भोसले यांनी म्हटले आहे. आरोपींवर भादवि कलम 307, 353, 294, 500, 501,120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)135 अन्वे गुन्हा दाखल आहे.
शाईफेक प्रकरण: काल मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रमासाठी येणार होते. त्यासाठी शेकडोंचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंचवडमधील भाजप पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पाण्यासाठी थांबले होते. चहा पाणी करून ते कार्यक्रमासाठी निघाले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील हे पडता पडता वाचले. आंदोलनकर्त्यांनी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.