बारामती - इंदापूर येथील लूटमार प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात पुणे ग्रामीण एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. घोष पिंटू काळे (१९) रा.राक्षसवाडी ता. कर्जत जि.अहमदनगर, असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तसेच याप्रकरणाती एका अल्पवयीन आरोपीला याआधीच ताब्यात घेण्यात आले होते.
राक्षसवाडी येथून आरोपीला अटक -
फरारी आरोपी पकडण्यासाठी पोलिसांनीतर्फे विशेष मोहीम राबवत आली. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपी घोष पिंटू काळे हा त्याच्या राक्षसवाडी येथे असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळ रचत आरोपीला ताब्यात घेतले.
काय आहे प्रकरण -
१५ डिसेंबर 2020 रोजी रात्री तीनच्या सुमारास इंदापूर बायपास येथे अंकुश गोरोबा काळे हे त्यांच्या आई, वडील व भाऊ यांच्यासह मुंबई येथून गावी उस्मानाबाद येथे जात असताना इंदापूर शहरातील बायपास रोडवरील एका हॉटेल जवळ लघुशंकेसाठी थांबले होता. त्या ठिकाणी अज्ञात ४ व्यक्तींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, घडयाळ, एटीएम कार्ड व रोख रक्कम २० हजार, असा एकूण ४६ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. तसेच त्यांना मारहाणदेखील केली होती.