ETV Bharat / state

'पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे बारीक लक्ष' - शिवाजीराव पाटील पुणे आरोग्य व्यवस्था लक्ष

सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातलेला आहे. पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष देत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

MP Shivajirao Patil attention on Pune healthcare system
शिवाजीराव पाटील पुणे आरोग्य व्यवस्था मत
author img

By

Published : May 3, 2021, 7:07 AM IST

पुणे - जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री दररोज आढावा घेतात. कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने शक्य असेल ते योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष देत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्यांनी दिली

लांडेवाडी येथे पुणे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरच्या उद्घाटनाला तहसीलदार रमा जोशी, शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख अरुण गिरे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, डॉ. ताराचंद कराळे, राजाराम बाणखेले, रवींद्र करंजखेले, जयसिंग एरंडे, सरपंच अंकुश लांडे, उपसरपंच दत्ता तळपे, उपस्थित होते.

एकत्र कोरोनाचा सामना केल्यास नक्कीच यश मिळेल -

रुग्णालयात भरतीसाठी व ऑक्सिजन बेडसाठी दररोज मला शेकडो लोकांचे फोन येतात. ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लांडेवाडी येथे कोविड सेंटर करावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार व तालुका प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता. प्रशासनाकडे असलेली डॉक्टरांची अपुरी संख्या लक्षात घेऊन पायोनियर हॉस्पिटलचे संचालक डॉ. ताराचंद कराळे यांच्याकडे सहकार्य मागितले होते. त्यांच्या माध्यमातून तीन डॉक्टर व चार मदतनीस उपलब्ध झाले आहेत. भैरवनाथ पतसंस्था व भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने टेबल-खुर्च्या, पंखे, टीव्ही, लाईट साहित्य, भोजन व्यवस्था आदी कामे मार्गी लागली आहेत. लांडेवाडी ग्रामपंचायतीनेदेखील कोविड सेंटरसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन कोरोनाचा सामना केल्यास हा लढा आपण लवकरच जिंकू, असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.