ETV Bharat / state

चासकमान जलाशय परिसरात बिबट्याच्या बछड्याचा अपघाती मृत्यू - चासकमान बिबट्या बछडा मृत्यू

रात्रीच्या अंधारात रस्ता ओलांडत असताना वाहनांची धडक बसून अनेक बिबट्यांचे मृत्यू होतात. चाकसमान जलाशयाच्या परिसरात बुधवारी अशीच एक घटना घडली.

leopard
बिबट्या
author img

By

Published : Jan 28, 2021, 12:28 PM IST

पुणे - चासकमान जलाशय परिसरातील बुरसेवाडी डॅम रस्त्यावर बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. वाहनाने दिलेल्या धडकेत या बछड्याचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी समोर आले. बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

बिबट्याच्या बछड्याचा अपघाती मृत्यू झाला
मागील काही दिवसांपासून चासकमान जलाशय परिसरात पाण्याची व्यवस्था असल्याने बिबट मादी व तिच्या बछड्यांचे वास्तव्य नागरिकांनी अनुभवले आहे. काल (बुधवारी) रात्रीच्या सुमारास बिबट्याचा बछडा शिकारीच्या शोधात बुरसेवाडी डॅम रस्त्यालगत जात असताना अचानक अज्ञात वाहनाची जोरदार धडक लागून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने सांगितले.

बिबटे शिकारीच्या शोधात रात्रीच्या अंधारात लोकवस्ती व रस्त्यालगत येऊन भटकंती करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बिबट्याचे अपघात व अपघाती मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. वनविभागाकडून बिबट्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना करण्याची मागणी बुरसेवाडी ग्रामपंचायत सदस्य अरुण गुंडाळ यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.