पुणे : पुण्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र वाढतच आहे. अनेकजण मृत्यूमुखी पडतात, तर बरेच गंभीर जखमी देखील होतात. असाच एक भीषण अपघात रविवारी रात्री घडला आहे. पुण्यातील एनआयबीएम रोडजवळील इशरत बागमधील चढावर बसचे ब्रेक फेल झाल्याने बसने 5 ते 6 वाहनांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात 2 जणांचा जागेवर मृत्यू झाला आहे. इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
5 ते 6 गाड्यांना धडक : रविवारी रात्री सात ते सव्वा सात दरम्यान एनआयबीएमरोडवरून ऑर्चिड पॅलेस समोरील उतारावरती वाय जंक्शन याच्या अलीकडील एमएच 12 एचबी 0242 ही गाडी नंबर असलेल्या खासगी बसचे ब्रेक फेल झाले. या बस चालकाने 5 ते 6 गाड्यांना धडक दिली आहे. यात 2 जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहे. या गाड्यांचे अपघातात मोठे नुकसान झाले आहे. कोंढव्याच्या इशरत बाग परिसरात या अपघातामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर खेळंबली होती.
उतारावर बसचे ब्रेक फेल : याबाबत अधिक माहिती अशी की, दि टाईम ट्रॅव्हल्सची ही बस होती. कोंढवा येथील ज्योती हॉटेलकडून एनआरबीएम रोडने सायंकाळी 7 वाजल्याच्या सुमारास जात होती. उतारावर बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाकडून मोठमोठ्याने सांगण्यात येत होते. परंतु तोपर्यंत बसने बीएमडब्ल्यू कारला, तसेच तीन कार आणि एक रिक्षासह एक दुचाकी चालकाला धडक दिली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात नेहेमी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र काल रविवार असल्याने गर्दी थोडी कमी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Sangli Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात पाच ठार
- Samruddhi Mahamarg Accidents: समृद्धी महामार्ग विकासाचा नव्हे, मृत्यूचा महामार्ग; तब्बल 39 जणांचा मृत्यू, 143 जण जखमी
- Himachal Accident News: कंटेनर 150 मीटर खड्ड्यात कोसळला, एकाच कुटुंबातील तीन जणांसह 6 जणांचा मृत्यू