ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; जन्मदिनीच डॉक्टरसह चालकाचा मृत्यू - mumbai-pune highway acceident 2 died

मुंबईहून परत येत असताना गाडी क्रमांक एम.एच.१४ जी.यु.११५८ याचे टायर पंचर झाले होते. ते चालक ज्ञानेश्वर आणि डॉ.केतन हे बदलत होते. तेव्हा भरधाव वेगात आलेली लक्झरी बस ने पाठीमागून कारला भीषण धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कार-बसच्या अपघातात डॉक्टरसह चालकाचा मृत्यू
author img

By

Published : Sep 16, 2019, 10:09 AM IST

पुणे - येथील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लक्झरी बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. लक्झरी बसने कारला पाठीमागून जोरात धडक दिली असता, हा अपघात झाला. डॉ. केतन खुर्जेकर आणि ज्ञानेश्वर भोसले अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या फसव्या आश्वासनानंतर 64 दुष्काळग्रस्त गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

जयेश पवार आणि प्रमोद भिलारे असे जखमींची नावे आहेत. आज (सोमवारी) मृत डॉ.केतन खुर्जेकर यांचा वाढदिवस होता. मात्र, याचदिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. मुंबईहून परत येत असताना त्यांच्या गाडीचे (एम.एच.१४ जी.यु.११५८) टायर पंचर झाले होते. त्यामुळे चालक ज्ञानेश्वर आणि डॉ.केतन टायर बदलत होते. तेव्हा भरधाव वेगात आलेल्या लक्झरी बसने पाठीमागून कारला भीषण धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ओझर्डेगाव हद्दीत घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या दिवशीच डॉ. खुर्जेकर यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ते पुण्यातील संचेती रुग्णालयात कार्यरत होते.

हेही वाचा - वर्ष उलटूनही पूर्णपणे प्लास्टिक बंदी नाही, मुंबईत प्लास्टिकचा खुलेआम वापर

Intro:mh_pun_01_av_accidet_mhc10002Body:mh_pun_01_av_accidet_mhc10002

Anchor:- मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावर झालेल्या भीषण अपघात दोघांचा मृत्यू झाला असून यात एका डॉक्टर चा समावेश आहे. लक्झरी बस ने कार ला पाठीमागून जोरात धडक दिली यात जागीच दोघांचा मृत्यू झाला आहे. डॉ.केतन खुर्जेकर आणि ज्ञानेश्वर भोसले असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जयेश पवार आणि प्रमोद भिलारे असे जखमींची नावे आहेत. आज मयत डॉ.केतन खुर्जेकर यांचा वाढदिवस होता. मात्र, आजच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. मुंबहुन परत येत असताना गाडी क्रमांक एम.एच-१४ जी.यु-११५८ याचे टायर पंचर झाले होते. ते चालक ज्ञानेश्वर आणि डॉ.केतन हे बदलत होते तेव्हा भरधाव वेगात आलेली लक्झरी बस ने पाठीमागून कार ला भीषण धडक दिली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ओझर्डेगाव हद्दीत घडली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, डॉ.केतन यांचा अपघात मृत्यू झाला असून आज त्यांचा वाढदिवस होता म्हणून हळहळ व्यक्त केली जात आहे. ते पुण्यातील संचेती रुग्णालयात कार्यरत होते. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.