पुणे- मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय असणारी गाडी 'डेक्कन एक्सप्रेस'चा प्रवास आता आणखी सुखकर आणि आरामदायी होणार आहे. या गाडीला 'एलएचबी कोच' लावण्यात आले आहेत. यामुळे प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे.
हेही वाचा- महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ
मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डेक्कन एक्सप्रेस गाडी महत्वाची आहे. या गाडीने असंख्य प्रवासी रोज प्रवास करतात. या गाडीचे जूने रूप पालटले असून नवा साज परिधान केला आहे. गाडीची अंतर्गत रचना पूर्ण बदलली असून प्रत्येक आसनाच्या रचनेनुसार एसी बसवण्यात आली आहे. जेवण करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक आसनासमोर एक मिनी टेबल लावण्यात आला आहे. मोबाईल चार्ज करण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. जनरल बोगीत मोकळी जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे उभे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
एलएचबी कोचची खास वैशिष्ट्ये...
अधिक प्रवासी क्षमता, विमानासारखी आकर्षक आसन व्यवस्था, संपूर्ण स्टेनलेस स्टीलचे कोच, संपूर्ण गाडीला डिस्क ब्रेक, अधिक शक्तिशाली एसी, एसी कोचमध्ये आवाज कमी, प्रवाशांना सामान ठेवण्यास अधिक जागा, पूर्वीपेक्षा 20 किमीने अधिक वेळ.