ETV Bharat / state

पुण्यातील एमआयटी विद्यापीठ विरोधात अभाविपचे 'विमान उडाव' आंदोलन - International Study Tour Case MIT

पुण्यातील एमआयटी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून 'इंटरनॅशनल स्टडी टूर' च्या नावाने लाखो रुपये घेतल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अभाविपच्या वतीने मंगळवारी एमआयटीमध्ये 'विमान उडाओ' आंदोलन करण्यात आले.

Abvp agitation MIT pune
विमान उडाव आंदोलन अभाविप
author img

By

Published : Jun 22, 2021, 7:32 PM IST

पुणे - पुण्यातील एमआयटी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून 'इंटरनॅशनल स्टडी टूर' च्या नावाने लाखो रुपये घेतल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अभाविपच्या वतीने मंगळवारी एमआयटीमध्ये 'विमान उडाओ' आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे दृश्य

अभाविपचा आरोप

एमआयटी विद्यापीठ दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विदेश अभ्यास दौरा आयोजित करते. यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतले जातात. परंतु, २०१९-२०२० या बॅचच्या विद्यार्थ्यांचा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय दौरा झाला नाही. मात्र, विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारण्यात आले आहे, असा अभाविपचा आरोप आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयीन शुल्क भरणे अवघड वाटत आहे, त्यात आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याच्या नावाने विद्यार्थ्यांची लूट करणे, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा -

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एमआयटीचा विदेश आभ्यास दौरा झाली नसताना विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची शुल्क आकारणी केली. प्रशासनाने संपूर्ण अभ्यास दौरा शुल्क त्वरित परत करावा, अन्यथा याहूनही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपने दिला.

एमआयटीचे स्पष्टीकरण -

दरम्यान अभाविपने केलेल्या आंदोलनाबाबत एमआयटीतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या बीटेक अंतिम वर्ष २०२०-२१ च्या विद्यार्थ्यांना आम्ही ३ पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे, आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा. यात विद्यार्थी पुढील तीन वर्षांत कधीही जाऊ शकेल. दुसरा पर्याय नामांकित परदेशी विद्यापीठातील ऑनलाईन कोर्सेस आणि तिसरा पर्याय म्हणजे वरिल दोन्ही पर्याय मान्य नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे परत करण्यात येईल. विद्यापीठाच्या प्रशासनाने हा निर्णय २० दिवसांपूर्वीच घेतला होता, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इंजिनियरिंग विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी दिली.

हेही वाचा - Jumbo Covid Hospital : रुग्णसंख्या घटल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल बंद होणार

या संदर्भात विद्यापीठाने सर्व पालक व विद्यार्थ्यांसोबत ३१ मे आणि १ जून २०२१ या दिवशी विस्तृत चर्चा केली. त्यावेळी सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले होते. तसेच, पालकांनी ऑप्शन फॉर्म भरून विद्यापीठ प्रशासनाकडे जमा केलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विचार करून त्यांचे पैसे परत देण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना कळविण्यात आला होता. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या बीटेक विद्यार्थ्यांना तीन पर्याय उपलब्ध करून दिल्या नंतर हे प्रकरण संपूर्णपणे बंद झाले होते. असे असून देखील अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्ते एमआयटी डब्ल्यूपीयूला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनामध्ये विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचा एकही विद्यार्थी सहभागी झाला नव्हता, असे संस्थेकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे, पोलीस परवानगी न घेता या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला, असे संस्थेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - सैन्यदलात नोकरीला असल्याचे भासवून तरुणीशी लग्न, नंतर आर्मीची बनावट नियुक्तीपत्र देऊन 60 लाखांची फसवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.