ETV Bharat / state

पुण्यामध्ये सापडले तब्बल 27 लाखांचे बनावट सॅनिटायझर, सहा जणांना अटक - बनावट सॅनिटायझर जप्त पुणे

स्वारगेट येथील मार्केट यार्ड परिसरातून सहा जणांना बनावट सॅनिटायझर तयार केल्याच्या कारणावरून अटक केली आहे. आरोपींनी बाजारामध्ये काही सॅनिटायझरची विक्रीसुद्धा केली होती.

ake sanitizers
पुण्यामध्ये सापडले तब्बल 27 लाखांचे बनावट सॅनिटायझर
author img

By

Published : Mar 18, 2020, 3:25 AM IST

पुणे - कोणताही परवाना नसताना बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. स्वारगेट येथील मार्केट यार्ड परिसरातून सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींचा 27 लाखांचा बनावट सॅनिटायझरचा कच्चा माल जप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी काही सॅनिटायझरची बाजारामध्ये विक्रीसुद्धा केली होती.

पुण्यामध्ये सापडले तब्बल 27 लाखांचे बनावट सॅनिटायझर
ake sanitizers
पुण्यामध्ये सापडले तब्बल 27 लाखांचे बनावट सॅनिटायझर

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर, पुणे पालिका आयुक्तांची माहिती

कुणाल उर्फ सोनू शांतीलाल जैन (वय-33), चेतन माधव भोई (वय-26), इरफान इकबाल शेख (वय 32), आसिफ आरिफ मणियार (वय 26), स्वप्नील शिवाजी शिंदे (वय-31) आणि महेश रामचंद्र तेंबेकर (वय 31) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात एक व्यक्ती बनावट सॅनिटायझरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कुणाल जैन आणि माधव भोई या दोन आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडे केलेल्या तपासणीत बनावट सॅनिटायझर सापडले. आरोपी स्वप्नील शिंदे याच्या मालकीच्या जागेत आरोपींनी बनावट सॅनिटायझर तयार केले होते. हे सर्व ते बाजारात विक्री करीत होते. या ठिकाणाहून पोलिसांनी तयार सॅनिटायझर आणि कचा माल असा 27 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.