आळंदी (पुणे)- संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळा अलंकापुरीमध्ये पार पडला. आज माऊलींची पालखीचं पंढरपुरकडे प्रस्थान पंढरपुरकडे
झालं. वारीदरम्यान वारकरी अभंग, भजनात तल्लीन होऊन जात असतात. मात्र, यावेळी दिंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, माऊलींच्या पालखीसोबत सामील होऊ न शकलेल्या गायक असलेल्या बाल वारकऱ्याने अभंग गाऊन दिंडीतील भावना जागृत केल्या आहेत.
यंदा आषाढी वारीवर कोरोनाचे संकट आहे. आज दुपारी दीड वाजता अलंकापुरीतून संत ज्ञानेश्ववर महाराजांच्या पादुका पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाल्या. यासाठी एसटी महामंडळाची विठाई बस तयार करण्यात आली होती. २० वारकऱ्यांच्या उपस्थित पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. आळंदीकरांनी हार फुलांचा वर्षाव करत माऊलींना मार्गस्थ केले.