पुणे- मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला काल सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या मृत्युमुखी पडलेल्या कामगारांमध्ये कांजणें नगर येथील गीता दिवाडकर या महिलेचाही सामावेश आहे. घरात दोन मुलं, सासू, आणि पती अस कुटुंब असताना गीता ही घरातील कर्ताधरता होती. ती एकटीच घरीच कमवत होती. त्यावरच गीताने त्याच्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. आत्ता काय करायच आम्ही, असा भावनिक प्रश्न गीताच्या कुटुंबीयांनी विचारला आहे.
'घरात एकटीच करता धरता होती ओ..आता काय करायचं'.. मुळशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबाची आर्त हाक - पिरंगुट औद्योगिक वसाहत आग लेटेस्ट न्यूज
गीता मुलांच्या शिक्षणासाठी मिळेल ते काम करत होती. आत्ता 6 महिनेच झाले ती एसव्हीएस कंपनीत कामाला लागली होती. रोज सकाळी 8 30 वाजता कामावर जायची आणि संध्याकाळी 6 वाजता परत यायची. पतीला गुडघ्याचा त्रास असल्याने ते काम करत नव्हते.