ETV Bharat / state

बारामतीत रहदारीच्या रस्त्यावर उलटला ट्रक

आज सकाळी दहाच्या सुमारास शहरातील एका गोडाऊनमध्ये युरिया उतरविण्यासाठी आलेला ट्रक चेंबरमध्ये चाक अडकल्याने उलटल्याची घटना घडली आहे.

उलटलेला ट्रक
उलटलेला ट्रक
author img

By

Published : May 30, 2021, 2:00 PM IST

बारामती - शहरातील बालक मंदिर शाळेसमोर युरिया वाहतूक करणारा ट्रक (एम.डब्ल्यू.के ०६१३) चेंबरमध्ये अडकून उलटला आहे. ट्रक जागेवरच उलटल्याने पुढील अनर्थ टळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणाही जखमी झाले नाही. परंतु, लोकवस्तीत घटना घडल्याने परिसरातील रहिवासी घाबरून गेले आहेत.

पालिकेकडून तीन दिवसांपूर्वीच करण्यात आली होती चेंबरची डागडुजी

आज सकाळी दहाच्या सुमारास शहरातील भिगवण चौकाजवळील बालक मंदिर शाळेसमोरील एका गोडाऊनमध्ये युरिया उतरविण्यासाठी ट्रक आला होता. मात्र रस्त्यात मोडकळीस आलेल्या चेंबरमध्ये अवजड ट्रकचे चाक अडकले व चेंबर खचला. चेंबरमध्ये चाक अडकल्याने ट्रक एका बाजूला झुकला. अगदी काही फुटांवरच याठकाणी घरे आहेत. शिवाय या रस्त्यावरून मोठी रहदारी होत असते. ट्रकचे चाक अडकून जागेवरच कलंडल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान येथील रहिवासी गिरीश दळवी यांनी बारामती नगरपालिकेकडे चेंबर खचून मोठा खड्डा पडल्याने, तो दुरुस्त करण्यासाठी अर्ज केला होता. पालिकेकडून तीन दिवसांपूर्वीच चेंबरची डागडुजी करण्यात आली होती.

हेही वाचा - निवडणुका जिंकण्यासाठी वापरलेले 'टुलकीट' आता भाजपावर उलटले - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.