ETV Bharat / state

गर्भवती महिलेला मारहाण करत पाजले विष.. बाळासह आईचा मृत्यू - बारामती क्राईम न्यूज

विषारी औषधाचा परिणाम होत असताना पीडितेला भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. भिगवण येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला.

गर्भवती सुनेला मारहाण करत पाजले विष.. बाळासह आईचा मृत्यू.

author img

By

Published : Jan 13, 2021, 1:34 PM IST

Updated : Jan 13, 2021, 1:55 PM IST

बारामती- इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावात सासरच्या लोकांनी गर्भवती सुनेला मारहाण करत विष पाजवल्याची घटना घडली. या घटनेत सुनेचा तिच्या बाळासह मृत्यू झाला. साजन नितीन भोसले (वय २३) असे त्या पीडितेचे नाव असून या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात नवरा, सासू, सासरे, सवतसह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू...

याप्रकरणी पती नितीन मच्छिंद्र भोसले, सासरा मच्छिंद्र भोसले, सासू औरंगाबाद भोसले, स्वप्नील भोसले, सवत नाजुका नितिन भोसले, मामा काळू बाटल्या पवार, अनिल पांडुरंग काळे,. दया अनिल काळे, पवन भोसले यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत तू आमच्या इथे राहू नकोस असे म्हणून तिला खाली पाडले. तसेच मारहाण करत बळजबरीने तिला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. विषारी औषधाचा परिणाम होत असताना तिला भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. भिगवण येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

Last Updated : Jan 13, 2021, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.