ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीकडून देहव्यवसाय करून घेणाऱ्या व्यक्तीला बेड्या - पुणे पोलीस न्यूज

प्रवीण शिंदे हा दौंड परिसरामध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीकडुन देहव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून दौंड तालुक्यातील पाटस येथील पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ त्याला अटक केली आहे.

A person caught by daund police who engaged in prostitution

author img

By

Published : Oct 8, 2020, 10:06 PM IST

दौंड (पुणे) - अल्पवयीन मुलीकडून देहव्यवसाय करून घेणाऱ्या एका व्यक्तीस पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. दौंड तालुक्यातील पाटस येथील पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. प्रवीण रामदास शिंदे असे अटकेत असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी (7 ऑक्टोबर) पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सुलभ शौचालयाच्या मोकळ्या जागेत आरोपी अल्पवयीन मुलीकडून देहव्यवसाय करून घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळला. पोलिसांनी लगेच सापळा रचून त्याला पकडले आणि मुलीची सुटका केली.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून 39 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते. बारामती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक फौजदार सागर चव्हाण, पोलीस हवालदार मुकुंद अयाचीत यांनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.