ETV Bharat / state

कोरोनाला हरवले.. १२ दिवसांच्या बाळाची कोरोनावर मात; आई देखील ठणठणीत - twelve day old baby over comes from corona virus

एका अवघ्या १२ दिवसाच्या चिमुकल्याने आणि आईने कोरोनावर मात केली आहे. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बाल आणि स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांच्या टीमचे कौतुक केले जात आहेत.

बाळाची कोरोनावर मात
बाळाची कोरोनावर मात
author img

By

Published : Jun 13, 2020, 12:54 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू हा दिवसेंदिवस आपली पायमुळं पसरवत असल्याचे दिसत आहे. या महामारीचा सर्वात जास्त धोका लहान मूल आणि वृद्ध व्यक्तींना असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शहरातील एका अवघ्या १२ दिवसाच्या चिमुकल्याने आणि त्याच्या आईने कोरोनावर मात केली आहे. यासाठी महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बाल आणि स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांच्या टीमचे कौतुक केले जात आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोनामुक्त महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीच्या दुसऱ्याच दिवशी महिलेला ताप आणि खोकला येत होता. बाळ सोबत असल्याने त्याची देखील श्वास घेण्याची गती वाढली होती. म्हणून बाळ आणि आईला महानगर पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. कोरोना संशयित म्हणून तातडीने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची कोरोना टेस्ट केली. तेव्हा, दोघेही पॉझिटिव्ह आढळले.

बाळाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले तर आईवर देखील उपचार सुरू केले. बाळाची श्वास घेण्याची गती अधिक झाली होती आणि बाळ धापा टाकत होते. त्यामुळे त्याला कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. बाळाने हळू हळू उपचाराला प्रतिसाद दिला, अखेर ४८ तासानंतर बाळ पूर्वस्थितीमध्ये आले.

अवघ्या दहा दिवसात बाळ आणि आईला डॉक्टरांनी कोरोनामुक्त केले आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाला असून घरी सोडण्यात आले आहे. डॉक्टरांच्या टीमने लहान बाळाला बेबी किट देत आशीर्वाद दिला. ही कामगिरी डॉ. दीपाली अंबिके, बालरोग विभाग प्रमुख व डॉ. महेश असलकर स्त्रीरोग विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.