ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड: आर्थिक विवंचनेतून एका व्यक्तीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या - naresh khatri suicide pimple saudagar

आत्महत्या करण्यापूर्वी नरेश यांनी एक चिठ्ठी माघारी सोडली आहे. यात त्यांनी आपण आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 31, 2020, 5:13 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात आर्थिक विवंचनेतून एका व्यक्तीने ९ व्या मजल्यावरून उडी घेतली आहे. ही घटना काल (३१ ऑगस्ट) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथे घडली अजून ती आज उघडकीस आली. नरेश प्रितम खत्री (वय ४२ रा. अल्को सोसायटी पिंपळे सौदागर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

नरेश यांनी काल सकाळी आपल्या मित्रांबरोबर नाष्ता केला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मित्रांना राहत असलेल्या इमारतीखाली बोलावून त्यांनी ९ व्या मजल्यावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी हे बाहेरगावी होते. नरेश यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्यांनी, गेल्या दीड वर्षापासून आपण आर्थिक विवंचनेत असून त्यातून बाहेर पडू शकलो नाही. माझे, कुटुंबावर आणि मित्रांवर खूप प्रेम आहे. आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये, अशा आशयाची ती चिठ्ठी असल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले आहे. नरेश यांच्या पश्चात एक मुलगी आणि पत्नी असा संसार आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहे.

हेही वाचा- सर्वात श्रीमंत अष्टविनायक...ओझरचा विघ्नेश्वर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.