ETV Bharat / state

ज्योतिषशास्त्राच्या खोट्या जाहिरातीद्वारे 30 ते 40 जणांची फसवणूक, उच्चशिक्षित तरुणाला बेड्या - सोशल मीडिया

'तुम पर काला जादू है' असे सांगून पुण्यातील एका महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. हा तरुण युट्युब आणि सोशल मीडियावर ज्योतिषशास्त्राची जाहिरात करून नागरिकांची फसवणूक करत होता.

ज्योतिषशास्त्राच्या खोट्या जाहिरातींद्वारे नागरिकांना लुबाडणारा गडाआड
author img

By

Published : Sep 9, 2019, 5:03 PM IST

पुणे - 'तुम पर काला जादू है' असे सांगून पुण्यातील एका महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शुभम शेतीया (21) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्तापर्यंत युट्युब आणि सोशल मीडियावर ज्योतिषशास्त्राची जाहिरात करून 30 ते 40 जणांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुण्यातील कोंढवा परिसरातील एका महिलेने तक्रार दिली होती.

ज्योतिषशास्त्राच्या खोट्या जाहिरातींद्वारे नागरिकांना लुबाडणारा गडाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घरात सतत भांडणे सुरू होती. ही भांडणे कमी व्हावीत यासाठी तिने यूट्युबवर पाहिलेल्या एका जोतिषशास्त्राच्या जाहिरातीतील मोबाईलवर संपर्क साधला असता, समोरील व्यक्तीने ज्योतिषी मोहम्मद अली बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेने आपली अडचण सांगितली असता, त्याने 'तुम पर काला जादू है' असे सांगितले. यावर उपाय म्हणून होमहवन करावे लागेल, बळी द्यावा लागेल असे सांगून तक्रारदार महिलेकडून 1 लाख 6 हजार रुपये घेतले. परंतु यानंतरही आयुष्यात फरक पडला नाही आणि ज्योतिषी आणखी पैसे मागत होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसात तक्रार दिली.

हेही वाचा - अबब... घरात चोरी करणारा निघाला पत्नीचा फेसबुक फ्रेंड

तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या फोन कॉलच्या आधारे तो राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर सायबर पोलिसांच्या एका पथकाने राजस्थानात जाऊन त्याला अटक केली. आत्तापर्यंत केलेल्या तपासात त्याने वेगवेगळ्या राज्यातील 30 ते 40 जणांची अशाप्रकारे फसवणूक केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून 1 लाख रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

Intro:
'तुम पर काला जादू है' असे सांगून पुण्यातील एका महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षीत तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या..शुभम शेतीया (वय 21) असे या तरुणाचे नाव आहे..त्याने आतापर्यंत युट्युब आणि सोशल मीडियावर जाहिरात जोतिषशास्त्राची जाहिरात करून 30 ते 40
नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे..पुण्यातील कोंढवा परिसरातील एका महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली होती..Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घरात सतत भांडणे सुरू होती..ही भांडणे कमी व्हावीत यासाठी तिने युट्युबवर पाहिलेल्या एका जोतिषशास्त्राच्या जाहिरातीतील मोबाईलवर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने जोतिशी मोहम्मद अली बोलत असल्याचे सांगितले.. फिर्यादी महिलेने आपली अडचण सांगितली असता त्याने ' तुम पर काला जादू है' असे सांगत यावर उपाय म्हणून होमहवन करावे लागेल, बळी द्यावा लागेल असे सांगितले. यासाठी फिर्यादीकडून 1 लाख 6 हजार रुपये घेतले..परंतु यानंतरही आयुष्यात फरक पडला नाही आणि जोतिषी आणखी पैसे मागत होता..त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसात तक्रार दिली.
Conclusion:तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचे फोन कॉल तपासले असता तो राजस्थानमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर सायबर पोलिसांच्या एका पथकाने राजस्थानात जाऊन त्याला अटक केली. आतापर्यंत केलेल्या तपासात त्याने वेगवेगळ्या राज्यातील 30 ते 40 नागरिकांची अशाप्रकारे फसवणूक केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून एक लाख रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत..अधिक तपास सुरू आहे..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.