ETV Bharat / state

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 'मास्क'चे वाटप, नागरिकांनी व्यक्त केले आभार

author img

By

Published : Mar 23, 2021, 8:27 PM IST

Updated : Mar 23, 2021, 9:14 PM IST

शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक अनोखा वाढदिवस पाहायला मिळाला. अनावश्यक खर्च टाळून विनामस्क फिरणाऱ्या व्यक्तींना मास्कचे वाटप करून सात वर्षीय अदिती परमेश्वर चिल्लरगे या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

सदरची बातमी रुटीन मिळाली आहे, विशेष नाही.
मास्क वाटप करताना

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक अनोखा वाढदिवस पाहायला मिळाला. अनावश्यक खर्च टाळून विनामस्क फिरणाऱ्या व्यक्तींना मास्कचे वाटप करून सात वर्षीय अदिती परमेश्वर चिल्लरगे या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. शहरातील विविध भागात चिल्लरगे कुटुंबाने मास्क वाटप केले आहेत. एकीकडे शहरातील बाधित रुग्णांची संख्या वाढत असून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून केलेला हा उपक्रम कौतुकास्पद मानला जात आहे.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 'मास्क'चे वाटप, नागरिकांनी व्यक्त केले आभार

शहरात दिवसेंदिवस वाढत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने वेगवेगळी निर्बंध लागू केली आहेत. तर, विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासन कारवाई बडगा उगारत आहेत. कोरोनापासून वाचायचं असल्याचे मास्क वापरणे महत्वाचे आहे. त्यामुळे मास्क हे जीवनावश्यक झाले आहे, असे म्हणता येईल. अनेक नागरिक विविध कामांमुळे घराबाहेर पडत असताना मास्क विसरतात. त्यानंतर, त्यांना हातरुमाल मास्क म्हणून वापरण्याची वेळी येते. तशी मुभा प्रशासनाने दिलेली आहे.

अनोखा उपक्रम राबवत नागरिकांना मास्कचे वाटप

हेच हेरून चिल्लरगे कुटुंबियांनी अदितीचा हटके आणि सामाजिक उपक्रम असलेला वाढदिवस साजरा करण्याचा ठरविले. त्यानुसार शहरातील वेगवेगळ्या भागात जळपास दोनशेहून अधिक मास्क वाटप केले. यात, बहुतांश गरजू आणि विनामस्क फिरणारे नागरिक होते. यावेळी बर्थडे गर्ल अदितीची आई अर्चना म्हणाल्या की, शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. विनामस्क फिरल्यास दंडात्मक कारवाई केली जाते आहे. हे सर्व पाहता अदितीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत नागरिकांना मास्क वाटप करण्याच ठरले त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे अर्चना चिल्लरगे यांनी सांगितले आहे. या सर्वांमध्ये अर्चना यांचे पती परमेश्वर चिल्लरगे यांनी पाठबळ दिल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिकांमधून अदितीचे कौतुक

सर्वसामान्य नागरिक आणि तरुणींनी या अनोख्या उपक्रमाबद्दल चिल्लरगे कुटुंबियांचे आभार मानले. अर्पिता गायकवाड म्हणाली की, हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे. कोरोना महामारीवर उपाययोजना म्हणून मास्क वाटप करणे हे खरच चांगले आहे. अशाच प्रकारे इतरांनीही अनावश्यक खर्च टाळून सामाजिक हिताचे उपक्रम राबवले पाहिजेत, असे ती म्हणाली.

हेही वाचा - शहीद दिन : हुतात्मा राजगुरुंच्या स्मारकाला सरकारी अनास्थेचा फटका

Last Updated : Mar 23, 2021, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.