पुणे- आजपासून देशभरातील दुसरा लॉकडाऊन संपला असून तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. अशा नागरिकांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे नावनोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ उत्तरप्रदेशच्या नागरिकांनी गर्दी केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
हेही वाचा- लाॅकडाऊन: दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...
अचानक मोठ्या संख्येने जमलेल्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला पंगावले. त्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. काही वेळानंतर या सर्व परप्रांतीय नागरिकांना एका मोकळ्या शेडमध्ये घेऊन जात या सर्व नागरिकांची नावे नोंदवून घेण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलीस अधिकारी अशोक कदम यांनी दिली.