ETV Bharat / state

पुण्यातील वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर रोखण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती - corona pune

मृत्यू झालेल्या तिनही रुग्णांमधील एका २७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला न्यूमोनिया होता. ५० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णास न्यूमोनिया, उच्च रक्तदाब हे विकार होते. त्याचबरोबर, ७७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला न्यूमोनिया, उच्च रक्तदाब व थायरॉईडचा विकार होता.

corona update pune
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
author img

By

Published : Apr 14, 2020, 8:59 PM IST

पुणे- शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्यात आल्याची माहिती, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली.

माहिती देताना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे विभागातील ६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आज विभागात ५१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून विभागातील एकूण रुग्ण संख्या ३८८ एवढी आहे. त्यात अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही २८५ एवढी आहे. मृत्यू झालेले तिनही जण हे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक असून ते ससून रुग्णालयात भर्ती होते. यात मृत्यू झालेल्या तिनही रुग्णांमधील एका २७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला न्यूमोनिया होता. ५० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णास न्यूमोनिया, उच्च रक्तदाब हे विकार होते. त्याचबरोबर, ७७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला न्यूमोनिया, उच्च रक्तदाब व थायरॉईडचा विकार होता.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात ३६ कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, सातारा जिल्ह्यात कोरोनाचे ७ रुग्ण असून त्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, सोलापुरात २ कोरोनाबाधित रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर सांगली जिल्ह्यात २६ कोरोनाबाधित रुग्ण आणि कोल्हापूरमध्ये ५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

हेही वाचा- गल्लो-गल्ली टाळ्या वाजवून नागरिकांनी पोलिसांना दिले प्रोत्साहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.