पुणे - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाची थेट जेलमध्ये रवानगी झाली आहे. याप्रकरणी अन्य दोघांनाही एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्निल पोटभरे असे वाढदिवस साजरा झालेल्या तरुणाचे नाव आहे.
स्वप्निलसह महेंद्र सरवदे, सलीम शेख, अभिषेक देवकर (सर्व रा. बालाजी नगर भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. यांच्यासह इतर ३ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी विशाल हनुमंत काळे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथे सार्वजनिक रस्त्यावर स्वप्निलचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी तलवारीने स्वप्निलचा केके कापण्यात आला होता. त्यामुळे, पोलिसांनी स्वप्निलसह २ जणांना अटक केली. स्वप्निलवर आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर, पाच जण अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा- उरुळी कांचनमध्ये ढगफुटी, बाजारपेठ आणि घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत