ETV Bharat / state

Minor Girl Rape : जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार - नववीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत (A minor girl was raped in Yawat police limits) १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (A 15 year old minor girl was raped) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई- वडीलांना जिवे मारण्याची धमकी देत नववीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलत्कार करण्यात आला आहे. या घटनेने दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Minor Girl Rape
Minor Girl Rape
author img

By

Published : Aug 10, 2023, 10:02 PM IST

दौंड : आई- वडीलांना जिवे मारण्याची धमकी देत नववीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार (A student of class IX was repeatedly raped) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. इस्माईल शब्बीर सय्यद (Ismail Shabbir Syed) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी १५ वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन पीडितेवर वारंवार बलात्कार करण्यात आला आहे.

जुलै ते ऑगस्ट दरम्यान मुलीवर बलात्कार : याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यातील एके दिवशी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पीडित युवती एकटी असताना इस्माईल सय्यद याने घरात येऊन पीडितेशी तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास पीडितेच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. आरोपी पीडित मुलीच्या घराशेजारी राहत होता. त्याचा फायदा घेत आरोपी इस्माईल सय्यदने पीडित तरुणीच्या ओळखीचा फायदा घेतला. तो पीडितेच्या घराशेजारी राहत असल्याने त्यांने वारंवार अल्पवयीन मुलीचा बलात्कार केला.

पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध : पीडित मुलगी 8 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आल्यानंतर आरोपी इस्मालियाने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी पूर्णपणे घाबरलेली असल्याने तिने या प्रकरणाची कोणालाच माहिती दिली नाही. मात्र, ती घरी एकटीच असल्याचा फायदा घेत आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलगी, तिचे कुटुंबीय भयभीत झाले असतानाच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, अमित कांचन, बोरीभडक उपसरपंच प्रवीण खेडेकर, माननीय उपसरपंच विकास अतकिरे यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली.

आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल : सदर आरोपीविरूद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, शस्त्र कायदा, अनुसूचित जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मटाले करीत आहेत.

हेही वाचा - व्हाट्सऍपवर मैत्री करून कथित पत्रकाराचा महिलेवर बलत्कार; गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.