ETV Bharat / state

राम मंदिर निर्माणासाठी 78 कोटींचा निधी जमा - गोविंदगिरी महाराज - गोविंदगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास पुण्यात

अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधण्यासाठी 78 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. यातील 24 कोटी रुपये लवकरच 'लार्सन अँड टुबरो' कंपनीकडे सुपूर्द केले जातील. 2024 पूर्वी भव्य राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न असेल, पण मंदिर उभारणीसाठी कुठलीही घाई करणार नसल्याचे राम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार गोविंदगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास यांनी पुण्यात सांगितले.

पुणे
पुणे
author img

By

Published : Nov 5, 2020, 7:19 PM IST

पुणे - अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधण्यासाठी 78 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. यातील 24 कोटी रुपये लवकरच 'लार्सन अँड टुबरो' कंपनीकडे सुपूर्द केले जातील. 2024 पूर्वी भव्य राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न असेल, पण मंदिर उभारणीसाठी कुठलीही घाई करणार नसल्याचे राम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार गोविंदगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास यांनी पुण्यात सांगितले.

राम मंदिर निर्माणासाठी 78 कोटींचा निधी जमा - गोविंदगिरी महाराज
राम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी वीर लहुजी वस्ताद यांनी वास्तव्य केलेल्या पाच ठिकाणांची माती संकलित करून पाठवण्यात आली. वीर लहुजी यांचे जन्मस्थान पेठ, लहुजींनी पुण्यातील गंजपेठेत बांधलेली तालीम, संगमवाडी येथील समाधीस्थळ आणि लहुजींचे वडील राघोजी साळवे यांची 'मांगीरबाबा यांची समाधी' या पाच ठिकाणच्या मातीचे संकलन करून अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी पाठविण्यात आली. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंदिर उभारणीत कोणतीही तडजोड नाही

गोविंदगिरी महाराज म्हणाले, मंदिर उभारणीसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी 10 आणि 100 ची कूपन तयार करण्यात आली आहेत. देशभरातील राम भक्तांनाही कूपण वाटले जाणार आहेत आणि त्यांच्यापासून निधी संकलित केला जाणार आहे. तसेच मंदिर उभारणीसाठी कुठलीही तडजोड करणार नाही, घाई करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.