पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्याला अनेक ऐतिहासिक परंपरा आहेत. अशाच जुन्नर तालुक्यातील वैशाखखेडे या गावात राहणाऱ्या शौर्य काकडे ( Shaurya Kakade Vaishakhkhede ) या 7 वर्षीय चिमुकल्याने एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ( India Book of Records Playing Cards throw ) झाली आहे. या मुलाने खेळण्याच्या पत्याला तब्बल 129 फुटपेक्षा अधिक लांब फेकत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे त्याच्या या रेकॉर्डमुळे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
129 फूट लांब पत्ता फेकून केला रेकॉर्ड : शेतकरी कुटुंबातील असणारा शौर्य याला लहानपणासून खेळाची आवड आहे. जिथे आपण दगड एवढ्या लांब फेकू शकत नाही, तिथे शौर्य 150 फूट लांबपर्यंत पत्ता सहज फेकू शकतो. शौर्य हा 7 वर्षाचा असून तो लहानपणापासूनच पत्ते फेकण्याचा सराव करतो. आज तो 150 फुटापर्यंत पत्ता सहज फेकू शकतो. पत्ता १२९ फूटांवर फेकून शौर्याने 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद केली आहे.
शौर्याला करायचीय देश सेवा : शौर्यला तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी मर्दानी खेळ सहजरीत्या व अप्रतिम सादर करतो. शेतकरी कुटुंबातील त्याचे वडिल किशोर काकडे हे शौर्यावर मेहनत घेत आहेत. त्याला खेळाचे विविध प्रकार ते शिकवत असून शौर्या ते सर्व प्रकार आनंदाने शिकत आहे. शौर्याला मोठे होऊन आर्मीमध्ये भरती व्हायचे आहे. पुढे जाऊन देशाची सेवा करायची आहे, असे तो अभिमानाने सांगतो.
'मुलांनी देशाचे प्रतिनिधित्व करावे' : शौर्यची बहीण इशिका देखील रायफल शूटिंगमध्ये खूप तरबेज आहे. कितीही लांबचे लक्ष असेल तरी ती सहज आरपार करते. आपल्या दोन्ही मुलांनी ऑलिंपिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे हे वडिलांचे व कुटुंबाचे स्वप्न असल्याचे वडील किशोर काकडे यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागातील या चिमुकल्याचे इंडिया बुकमध्ये रेकॉर्ड झाल्याने त्याचे कौतुक होत आहे. त्याची ही अनोखी असलेली कला सर्वांना आकर्षित करत आहे.
हेही वाचा - आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला फटका बसेल?