पुणे- वारजे परिसरातील रामनगर येथे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ७ वाहनांची मंगळवारी रात्री तोडफोड करण्यात आली. नववर्षाचे स्वागत करत असताना तरुणांच्या एका टोळक्याने हे कृत्य केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. बांबू आणि दगडांच्या सहायाने आरोपींनी गाड्या फोडल्या. वारजे पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून वारजे परिसरात गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार सुरू आहे. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांना मध्यरात्रीच्या सुमारास समाजकंटक लक्ष करतात. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक राहिला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
हेही वाचा- कोरेगाव भीमा शौर्यदिन; विजयस्तंभावर अनुयायांची गर्दी, पोलीस प्रशासन सज्ज