पुणे - खडकवासला धरणाच्या कालव्याजवळ असलेल्या झुडुपांमध्ये एका चिमुकलीचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अंदाजे पाच ते सात महिने वय असलेल्या या मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. झुडपात असलेला हा मृतदेह भटक्या कुत्र्यांनी ओढून बाहेर आणल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आला.
खडकवासला धरण परिसरात एका लहान मुलीचा मृतदेह सापडला पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या मृतदेहाचे शिर धडा वेगळे झालेले आहे. मृतदेहाजवळ दुधाची बाटली आढळली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी मृतदेह झुडपात आणून टाकला असावा, अशी शक्यता आहे. दरम्यान, हवेली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. आतापर्यंत झालेल्या तपासात या चिमुकलीची ओळख पटवण्यात हवेली पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात एका बालिकेचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. हा तिचाच मृतदेह असल्याचे तिच्या वडिलांनी ओळखले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - नंदुरबार, सातारा अन् बीड जिल्ह्यात महिला व बालकाच्या विरोधात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले