ETV Bharat / state

गावठी दारू भट्टीवर धडक कारवाई, तब्बल 7 लाखांची दारू नष्ट

पुणे जिल्ह्यातील चाकण येथील अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने दोन ठिकाणी धडक करावाई केली. यात गावठी दारूसाठीचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. यात एकूण 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच दारू भट्टी चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune
पुणे
author img

By

Published : May 6, 2021, 5:24 PM IST

पुणे - पुणे जिल्ह्यातील चाकण येथील अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने धडक करावाई केली. यात तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. तर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी दारू भट्टीवर धडक कारवाई, तब्बल 7 लाखांची दारू नष्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी गुन्हे शाखा युनिट 3 चे अधिकारी व कर्मचारी कोविड 19 संदर्भात संचारबंदीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीत काळूस गावच्या परिसरात, भामा नदीच्या काठावर उत्तरसिंग राजकुमार राठोड हा भट्टी लावून गावठी दारु काढत आहे, अशी बातमी मिळाली. या पथकातील अधिकारी व स्टाफने या ठिकाणी जाऊन छापा टाकला. तेवढ्यात तेथील एकजण पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून गेला. तेथे 5,00,000 रुपये किमतीचे एकूण 10 हजार लिटर कच्चे रसायन, दारू काढण्यासाठी लागणारी साधने आढळून आली. ते सर्व जागीच नष्ट केले. तसेच, उत्तरसिंग राजकुमार राठोड (रा. काळूस ता.खेड जि.पुणे) याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी एका ठिकाणी कारवाई

तसेच दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत कुरुळी गावच्या परिसरात सनी कंपनीच्या मागे मोकळ्या जागेत अमृत राठोड हा गावठी दारु काढत आहे, अशी बातमी मिळाली. तेव्हा गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकातील अधिकारी व स्टाफने या ठिकाणी जाऊन छापा टाकला. तेथीलही एकजण पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून गेला. तेथे 2,00,000 रुपये किमतीचे एकूण 4 हजार लिटर कच्चे रसायन, दारू काढण्यासाठी लागणारी साधने आढळून आली. ते सर्व जागीच नष्ट केले. तसेच, अमृत नरपतसिंग राठोड (रा. निघोजे ता. खेड जि. पुणे) यांच्याविरुद्ध म्हाळुंगे चौकी, चाकण पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुढील तपास शंकर बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट 3 पिंपरी चिंचवड करीत आहे.

हेही वाचा - लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईकरांना भीती, लसीकरणाला गर्दी

हेही वाचा - राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण, मुंबईकरांना सहन करावे लागणार चटके

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.